अमित देशमुख भाजपच्या वाटेवर…? कारणही आलं समोर…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
लातूर :- लातूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं वक्तव्य आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं आहे.
निलंगेकर यांच्या या वक्तव्यानं लातुरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आपला राजकीय वारसा आणि सत्तेचा पायंडा साबुत राखण्यासाठी आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. या विधानानंतर लातूर जिल्ह्यात चर्चेला उधाण आलं आहे. नेमकं काय म्हटलं निलंगेकर यांनी?
निलंगेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. निलंगेकर यांच्या या वक्तव्यामुळे लातुरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आपला राजकीय वारसा आणि सत्तेचा पायंडा साबुत राखण्यासाठी आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचा दावा निलंगेकर यांनी केला आहे.
ते भाजप युवा मोर्चाच्या मेळाव्यात बोलत होते. पुढे बोलताना निलंगेकर यांनी म्हटलं की, जरी अमित देशमुख हे भाजपमध्ये येण्यास इच्छूक असले तरी मात्र आम्ही त्यांना पक्षा घेणार नाही. निलंगेकर यांच्या या वक्तव्यामुळे लातुरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
काँग्रेसला मोठा धक्का बसणार?
लातुरच्या राजकारणात देशमुख घराण्याचं मोठं वर्चस्व आहे. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते. लातुर जिल्ह्यात देशमुख घराण्याला मोठा जनाधार लाभला आहे. मात्र आता अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं वक्तव्य निलंगेकर यांनी केलं आहे. अमित देशमुखांनी कमळ हाती घेतल्यास हा काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….