जनरलच्या तिकीटावर त्याच पैशांत स्लीपरमधून प्रवास करता येणार ; रेल्वेचा निर्णय…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- रेल्वेने प्रवास करणारे असाल आणि तिकीट बुक नसेल तर एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही जनरल तिकिटमध्ये स्लीपर कोचमधून प्रवास करू शकणार आहात. महत्वाची बाब म्हणजे यासाठी तुम्हाला एक रुपयाही अतिरिक्त शुल्क भरावा लागणार नाही.
देशभरात कडाक्याची थंडी पाहता भारतीय रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. जनरल तिकीट घेणारे प्रवासीही स्लीपर क्लासमध्ये प्रवास करू शकतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. आता हा निर्णय काही ठराविक काळासाठीच असेल. त्यामुळे जवनरलचे तिकीट काढलेल्या लोकांना सुरक्षित प्रवास करणे सोपे होणार आहे.
ज्या गाड्यांचे स्लीपर कोच 80 टक्क्यांपेक्षा कमी भरलेले असतात, त्या ट्रेनची माहिती मागविण्यात आली आहे. प्रवाशांना प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रेल्वे त्या सर्व स्लीपर कोचचे रूपांतर जनरलमध्ये करण्याचा विचार करत आहे. हिवाळ्याच्या मोसमात अनेक प्रवासी स्लीपर कोचऐवजी एसी कोचने प्रवास करणे पसंत करत आहेत, त्यामुळे स्लीपर कोचमध्ये प्रवासी कमी आहेत. यामुळे रेल्वेने एसी कोच वाढविण्यास सुरुवात केली आहे.
हिवाळ्याच्या हंगामामुळे स्लीपर कोचमधील 80 टक्के सीट रिकाम्या असतात. सामान्य तिकिटाने प्रवास करणार्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. हे पाहता रेल्वेने स्लीपर कोचला जनरल कोचचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….