बुलढाणा : अतिरेकी हल्ल्यामुळे बसस्थानकात खळबळ…!; अतिरेक्यांना जेरबंद केल्यावर समजले की….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बुलढाणा :- प्रवाशांनी गजबजलेल्या बुलढाणा बसस्थानकात आज दुपारी अचानक कमांडो आणि श्वान पथक दाखल झाले. त्यांनी तडकाफडकी कारवाई करीत तीन अतिरेक्यांना जेरबंद केले. यामुळे भयभीत प्रवाशांची एकच तारांबळ उडाली.
मात्र, सत्य समोर येताच उपस्थितांसह प्रवाशांचे चेहरे खुलले अन् सर्वांचा जीव भांड्यात पडला.
अतिरेकी हल्ला आणि हास्य हे वाचून कुणीही बुचकाळ्यात पडणे स्वाभाविकच आहे. त्याचे कारणही तसेच मजेदार आहे. अतिरेकी हल्ला झालाच तर पोलीस दल कितपत तयार आहे, याची चाचपणी करण्यासाठी ‘मॉक ड्रिल’ अर्थात रंगीत तालीम करण्याचे निर्देश सर्व पोलीस आयुक्तालयांना देण्यात आले आहे. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम व बुलढाणा शहराचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज, सोमवारी ही तालीम पार पडली.
ही तालीम हजारो प्रवाशांसाठी आज दिवसभर चर्चेचा विषय ठरली. बुलढाणा बसस्थानकातून सुटणाऱ्या बहुतेक बसमध्ये यावरच चर्चा रंगली होती. अनेकांनी ही कारवाई आपल्या मोबाईलमध्ये टिपली.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….