‘वंचित’चा महाविकास आघाडीत येण्याचा मार्ग मोकळा, शरद पवारांनी दिले स्पष्ट संकेत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना आणि वंचित बहुजन विकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून एकत्र येण्यासाठी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा विरोध असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता.
पण, ‘अनेक प्रश्नावर एकत्र येण्याची भूमिका घेत असतो. उद्याच्या निवडणुकी पाहता निर्णय घ्यायला अवघड ठरणार नाही’ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वंचितचा मार्ग मोकळा करून दिला आहे. शिंदे गटाला टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी वंचित आघाडीला सोबत घेण्याची तयारी सुरू केली आहे. पण, महाविकास आघाडीतून नकार येत असल्यामुळे निर्णय रखडला आहे.
पण, शरद पवार यांनी आता हिरवा कंदील दिला आहे. ‘काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं एकत्र पाऊल टाकण्याची गरज आहे. काही गट आणि पक्ष आहे त्यांचा समावेश करावा, अशी इच्छा आहे. त्यांच्या सहभागाबद्दल अजून निर्णय घेतलेला नाही.
अनेक प्रश्नावर एकत्र येण्याची भूमिका घेत असतो. उद्याच्या निवडणुकी पाहता निर्णय घ्यायला अवघड ठरणार नाही, असं शरद पवार म्हणाले.
ज्यांच्या हाती सत्ता असते त्यांनी जमिनीवर पाय ठेऊन राहायचं असतं. मात्र काही लोक हे टोकाची भूमिका घेत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
यावेळी पवार यांनी शिंदे गट आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या वादावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेत दोन गट पडले हे खरं आहे. मात्र कडवा शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान महाविकास आघाडी एकत्रित पाऊले टाकत असून, आणखी काही गटांना सोबत घेण्याची चर्चा सुरू असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
यावेळी शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ‘अनेक राज्यपाल या राज्यात पाहिले आहेत, त्यांनी राज्याच्या हिताचे मार्गदर्शन केले. मात्र हे राज्यपाल सतत वादग्रस्त व्यक्तव्य करतात. त्या पदाची प्रतिष्ठा कोश्यारी यांच्याकडून राखली जात नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….