भाजपच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कधीच प्रेम नव्हतं : संजय राऊत…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भारतीय जनता पक्षाच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कधीच प्रेम नव्हतं, यांना मराठी माणूस, मराठी साम्राज्याविषयी प्रेम नाही.
छत्रपती शिवरायांचा राज्यपालांनी जो अपमान केला आहे, मुख्यमंत्र्यांनी त्याचा जाब विचारला असता, असा सवाल खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे (udhhav Thackaray) यांची फेब्रुवारीत नाशिकच्या (Nashik) गोल्फ क्लब मैदानात सभा होणार असून या सभेच्या नियोजनासाठी संजय राऊत आज नाशिकला आले आहेत. त्याचबरोबर उद्या ते संघटनात्मक बांधणीवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, शिवसेना हा महावृक्ष आहे, कचरा पडतो, नवीन पालवी फुटते, बहरलेला वृक्ष असून शिवसेनेची ताकद काय आहे, हे उद्याच्या निवडणुकीत दिसेल. तेव्हा भेटू, तेव्हा बोलू, तेव्हा सांगू. योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन पाच कोटी लाख रुपयांची गुंतवणूक नेली. महाराष्ट्रात आमचे मुख्यमंत्री काय करताय तर, त्यांचे वर्हाड आणि बिर्हाड बर्फ उडवायला जर्मनीत चालले आहे. इकडे योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्र्यांच्या नाकासमोरून पाच लाख कोटींची गुंतवणूक ओढून नेली. मात्र मुख्यमंत्री यांना काही करता आलेलं नाही.
छत्रपती शिवरायांच्या अपमानावर यांची वाचा गेली आहे. मुळात भारतीय जनता पक्षाच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कधीच प्रेम नव्हतं, काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांची तुलना मोदींशी केली होती. त्यानंतर मुंबईत मोठ मोठे होर्डिंग लागले. यांना मराठी माणूस, मराठी साम्राज्य याच्याविषयी प्रेम नाही. जर ते प्रेम खरोखर असतं तर मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री राजभवनाच्या दरवाजावर लाथ मारून आत गेले असते. छत्रपती शिवरायांचा राज्यपालांनी जो अपमान केला आहे, त्याचा जाब विचारला असता. संपूर्ण सरकार दिल्लीला आलं असत, अमित शहाला भेटून सांगितलं असतं, छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना त्वरित पायउतार करा, केलं का नाही? असा सवाल संजय राऊत याची केला आहे.
ते पुढे म्हणाले, कचऱ्याला आग लागते, मग धूर येतो. हे खासदार परत निवडून येणार नाहीत. हा पाचोळा गोळा करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते निवडून येणार नाहीत. समद्धीचे पैसे, ठेकेदारीचे पैसे यातून पक्ष उभा राहत नाही, पक्ष जो आहे, शिवसेना तो रक्त घाम आणि त्यागातून उभा राहिला आहे. आतापर्यंत मी कधीही कोणाचा एकेरी उल्लेख केलेला नव्हता. मात्र नारायण राणे यांनी डिवचलं आणि मला सकाळी उत्तर द्यावं लागलं. त्यानंतर त्यांनी मला ओळखणं बंद केला आहे. हा त्या पक्षाचं संस्कार आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा सुद्धा एकेरी उल्लेख केला. पण आम्ही सगळ्यांनी संयम राखला. पण आता यापुढे नाही. आपल्यावर संस्कार छत्रपती शिवरायांचे त्यामुळे आमच्या नादाला लावू नका. नारायण जर चॅलेंज करत असतील म्हणा, कुठे येऊ मी, तुम्ही कोण आहात मला विचारणारे… पण माझ्या पक्षासाठी संकटात उभे राहिलो, पण मी पक्ष बदलला नाही किंवा गुडघे टेकले नाही, मी कोर्टात सामोरे गेलो आणि लढलो, अशा शब्दात त्यांनी नारायण राणेंना प्रत्युत्तर दिले.
उद्धव ठाकरे यांची सभा गोल्फ क्लब मैदानावर
नाशिक हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र आजच्या घडीला असंख्य कार्यकर्त्यानी शिंदे गटात प्रवेश केल्याने अवस्था बिकट झाली आहे. हेच डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः नाशिकच्या मैदानात उतरणार आहेत. नाशिक शहरातील गोल्फ क्लब मैदानात हि सभा होण्याचे निश्चित झाले आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत हे आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. तत्पूर्वीच पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. यामुळेच शिंदे गटाकडून ठाकरे गटाला नवीन भगदाड पडले आहे. नाशिकचे जवळपास 50 पदाधिकारी कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश केला.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….