सेना-भाजप युती तुटावी अशी आमची इच्छाच नव्हती: बावनकुळे ; बेईमानी केल्याने घेतला बदला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सेना-भाजप युती तुटावी अशी आमची इच्छाच नव्हती. जर दोन्ही पक्ष सोबत असते तर अनेक वर्षे सत्तेत राहिलो असतो, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत केले.
देवेंद्र फडणवीसांचा चेहरा वापरून त्यांनी निवडणुका लढविल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. जेव्हा जेव्हा समाजात बेईमानी होते तेव्हा निसर्गच बदला घेत असतो. शिंदे-फडणवीसांचे सरकार हे नैसर्गिक सरकार आहे, असा दावा बावनकुळे यांनी केला.
महाविकास आघाडीच्या काळात पालकमंत्री आणि मुख्यमंत्री आढावा बैठकाच घेत नव्हते. शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून मिळत असलेली तोकडी मदत हे महाविकास आघाडी सरकारचेच पाप आहे, असा आरोपही त्यांनी केला.
पवारांना इतके काय लागले?
अजितदादांनी तुमचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिलाय, असा उल्लेख राष्ट्रवादीचे सदस्य शशिकांत शिंदे यांनी त्यांच्या भाषणात केला. यावर मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे तर बारामतीच्या दौऱ्यात मी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येणार असे बोलू का? माझी भूमिका आमच्या पक्षाच्या उमेदवारासाठीच असेल हे स्पष्ट आहे. मी एकदाच बारामतीत गेलो आणि पवारांना त्याचे नेमके इतके काय लागले, असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…