काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना गंभीर दुखापत ; उपचारासाठी रुग्णालयात दाखल…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे हलविण्यात आले. बाळासाहेब थोरात मॉर्निंग वॉकला गेले असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली असून त्यांच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे.
प्राथमिक तपासणीनंतर दुखापत अधिक असल्याचे लक्षात आल्याने त्यांना उपचार साठी तातडीने मुंबईत शिफ्ट करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, बाळासाहेब थोरात आज सकाळी 6 वाजता सिव्हील लाइन भागात वॉक करत असताना पाय घसरून पडले. यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. त्यांना तातडीने मेयो रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले. त्यापूर्वी त्यांना अधिवेशनासाठी तैनात केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासले होते. मेयो येथे उपचारानंतर त्यांना पुढील उपचाराकरिता मुंबईला हलविण्यात आल्य़ाचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…