देशात काय मोगलाई आहे का…? सीमावादावर सभागृहात बोलताना उद्धव ठाकरे आक्रमक…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- आज हिवाळी अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. अपेक्षेप्रमाणे आज विरोधकांकडून सभागृहात महाराष्ट्र, कर्नाटक सीमावादाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
यावर सभागृहात उद्धव ठाकरे बोलत आहेत. सीमावादाच्या प्रश्नावरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे, भाजप सरकारला जोरदार टोला लगावला. सीमावर्ती भागात मराठी माणसांवर अत्याचार सुरू आहे. जेव्हा तेथील ग्रामपंचायतींनी महाराष्ट्रात जाण्याचा ठराव संमत केला तेव्हा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला, त्या ग्रामपंचायती बरखास्त करण्यात आल्या.
देशात काय मोगलाई आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी सीमावादावरून एकनाथ शिंदे यांना देखील टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांना टोला यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला आहे.
काही जण आम्हाला म्हणतात की तुम्ही आम्हाला सीमा प्रश्नाबाबत काय सांगता? आम्ही या लढ्यात काठ्या खाल्ल्या आहेत. पण तुम्ही जेव्हा या लढ्यात काठ्या खल्ल्या तेव्हा तुम्ही शिवसेनेमध्ये होतात. आता पक्षा बदलला तर शांत बसायचं असा त्याचा अर्थ होत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
सभागृहात पेनड्राईव्ह दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी सभागृहात एक पेनड्राईव्ह देखील सादर केला. या पेनड्राईव्हमध्ये कर्नाटक सीमावादावर असेली फिल्म सर्व सभासदांना दाखवण्यात यावी अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी अध्यक्षांकडे केली. तसेच यावरून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना देखील टोला लगावला आहे. विरोधी पक्षात असताना पेनड्राईव्ह द्यावेच लागतात असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…