जयंत पाटील यांच्यावरील कारवाई मागे न घेतल्याने विधानसभेतून विरोधकांचा सभात्याग….!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- सभापतींविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी २६ डिसेंबर या दिवशी विधानसभेत केली.
जयंत पाटील यांना सहभागृहात सहभागी होण्याची अनुमती देण्याची मागणी या वेळी अजित पवार यांनी केली. याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सांगितले. हे उत्तर मान्य न झाल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. त्यामुळे तारांकित प्रश्नांवरील चर्चा विरोधकांच्या उपस्थितीविना झाली. जयंत पाटील यांनी सभागृहात ‘अध्यक्ष महोदय, तुम्ही असा निर्ल्लजपणा करू नका’, असे अध्यक्षांविषयी अवमानकारक वक्तव्य केले होते.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…