लक्ष्य होताच उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये ; संजय राऊत यांच्यासह नागपूर येथे दाखल…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि दिशा सालीन मृत्यू प्रकरणात सत्ताधारी नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही हे आरोप झाल्याने प्रकरण गंभीर बनले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अधिक आक्रमग होण्याची शक्यता आहे. कदाचित त्याचमुळे उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत (Sanjay Raut), वरूण सरदेसाई, मिलिंद नार्वेकर हे प्रमुख नेते एका विशेष विमानाने नागपूर येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
संसदेचे अधिवेशन एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे संजय राऊत हेसुद्धा आता ठाकरे यांच्यासोबत नागपूरला हजर झाले आहेत. उद्धव ठाकरे आणि या सर्वच प्रमुख नेत्यांचे एकत्र नागपूरला हजर होणे हे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे. राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे. संजय राऊत हे नागपूर येथे एक मोठा गौप्यस्फोट करणार आहेत.
शिवसेना (उद्धव ठाकरे) आमदार सचिन अहिर यांना प्रसारमाध्यमांनी याबाबत विचारले असता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विदर्भातील पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेणार आहेत. त्यामुळे या बैठकीचा अनेकांनी धसका घेतला आहे, असा टोला अहीर यांनी लगावला आहे. दरम्यान, महाराष्ट्राशी संबंधीत विविध विषय आम्ही अधिवेशन काळता सभागृहात काढला असता सत्ताधारी आम्हाला बोलू देत नाहीत. आम्ही विदर्भाचा प्रश्न उचलला तरीही सत्ताधाऱ्यांनी हेच केले. त्यामुळे विरोधी पक्ष नेते आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सभागृहामध्ये 298 अन्वये विदर्भाचा विषय उपस्थित करणार आहेत.

“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”
९ नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर बंजारा समाजाचा विशाल मोर्चा ; निरंजन नाईक होणार सहभागी….