द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडू :- राहुल गांधी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘ भारत जोडो यात्रा’ १०७ दिवसांत तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून शनिवारी राजधानी दिल्लीत दाखल झाली.
काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी या त्यांच्यासोबत यात्रेत सहभागी झाल्या.
ज्येष्ठ अभिनेते कमल हासन हेही भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. तुमच्या द्वेषाच्या बाजारात मी प्रेमाचे दुकान उघडायला आलो आहे, असे मी आरएसएस व भाजपच्या लोकांना सांगितल्याचे राहुल गांधी म्हणाले.
दिल्लीत आल्यावर राहुल गांधी यांनी प्रथम आश्रम चौकातील जयराम आश्रमातील सीयाराम दरबाराचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी हजरत निजामुद्दिन औलिया यांच्या दर्ग्यात जाऊन चादर चढवली. सायंकाळी लाल किल्ल्यावर यात्रा पोहोचली. यात्रा ९ दिवस स्थगित राहणार आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!