पोलिस भरतीची २ जानेवारीपासून मैदानी! १८ लाख अर्ज ; भरतीचे होणार व्हिडिओ शुटिंग….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातील चालक व पोलिस शिपाई पदाच्या १८ हजार ३३१ जागांसाठी तब्बल १८ लाख २७ हजार उमेदवारांनी (एका जागेसाठी तब्बल १०० उमेदवारांचे अर्ज) अर्ज केले आहेत.
उमेदवारांना परीक्षेचे वेळापत्रक २२ डिसेंबरनंतर त्यांच्या मोबाईलवर पाठविले जाणार असून २ जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरु होणार आहे. त्यानंतर त्या त्या जिल्ह्यांनी त्यांच्या सोयीनुसार पुढील दिवस निश्चित करायचे आहेत.
मैदानी चाचणीच्या दृष्टीने प्रत्येक शहर-जिल्ह्यात मैदानांची तयारी केली जात आहे. पहिल्यांदा चालक पदांची मैदानी होईल आणि त्यानंतर पोलिस शिपाई पदांसाठी उमेदवारांना बोलावले जाईल. दररोज किमान एक हजार उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. १९ डिसेंबर रोजी सर्व जिल्ह्यांना त्यांच्या जिल्ह्यातील जागांसाठी नेमके किती व कोणत्या संवर्गातील किती अर्ज प्राप्त झाले आहेत, याची माहिती पोलिस महासंचालक कार्यालयाकडून पाठवली जाणार आहे. २२ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यांनी ठरवलेले नियोजन पोलिस महासंचालकांना कळवायचे आहे. मंगळवारी (ता. २०) त्यासंबंधी पोलिस महासंचालक बैठक घेतील. त्यानंतर संबंधित उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र पाठविले जाणार आहे. एकापेक्षा अधिक अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कोणत्या ठिकाणी परीक्षा द्यायची हे ठरवायचे आहे. कोणत्याही उमेदवारांना दोन ठिकाणी परीक्षा देता येणार नाही. भरती प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमीत कमी राहणार असून भरतीत कोणत्याही प्रकारची वशिलेबाजीला वाव राहणार नाही, असे तगडे नियोजन करण्यात आले आहे.
जेथे मैदानी तेथेच लेखी परीक्षा
पोलिस भरतीसाठी काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज केले आहेत. पण, त्या उमेदवारांना केवळ एकाच ठिकाणी मैदानी व लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. मैदानी चाचणी झाल्यावर काही दिवसांनी लेखी चाचणी होणार आहे. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात एकाच दिवशी लेखी परीक्षा घेतली जणार आहे. परंतु, उमेदवाराने ज्या शहरात-जिल्ह्यात मैदानी चाचणी दिली, त्याचठिकाणी त्याला लेखी परीक्षा देखील द्यावी लागणार आहे.
गैरप्रकारावर ‘सीसीटीव्ही अन् व्हिडिओ’ वॉच
मैदानी चाचणी सर्वच उमेदवारांची होईल, त्यातून प्रत्येकी एका जागेसाठी दहा उमेदवारांची मेरिटनुसार लेखी परीक्षेसाठी निवड होईल. मैदानी चाचणी व लेखी परीक्षेत गैरप्रकार होऊ नये म्हणून मैदानावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहे. तसेच प्रत्येक इव्हेंटचे व्हिडिओ शुटिंग केले जाणार आहे. त्यासंबंधीच्या सूचना पोलिस महासंचालकांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
सिद्धेश्वर यात्रेदिवशी सोलापुरात चार दिवस सुटी
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांच्या यात्रेनिमित्त १२ ते १५ जानेवारी या चार दिवसांत जिल्ह्यातील उमेदवारांची मैदानी चाचणी होणार नाही. त्या दिवशी उमेदवारांना सुटी राहील. दरम्यान, २ ते ११ जानेवारीपर्यंत मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन आहे, पण उमेदवार शिल्लक राहिल्यास त्यांची सुटीनंतर मैदानी घेतली जाणार आहे. पण, प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिसांना पथसंचलनाची तयारी करावी लागते. त्यामुळे २६ जानेवारीनंतर त्या उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्याचेही नियोजन केले जात आहे. त्यासंदर्भात २२ डिसेंबर रोजी अंतिम निर्णय होईल.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….