महापुरुषांबद्दल वाईट बोलणाऱ्यांना रट्टा दिला पाहिजे ; बच्चू कडूंची रोखठोक भूमिका म्हणाले…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्यांचा मालिकाच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
आधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीने उद्या 17 डिसेंबरला मुंबईत महामोर्चाचे आयोजन केलं आहे. अशातच खासदार संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला असे विधान केले आणि नवा वाद सुरु झाला.
यावर प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. बच्चू कडू यांचे महाविकासआघाडीच्या मोर्चाला समर्थन महापुरुषांबद्दल वक्तव्य करणाऱ्या विरोधात मोर्चा काढत असेल तर ते चांगलंच आहे. तसेच त्यांच्याविषयी कोणी वाईट बोलत असेल तर त्याला रट्टा दिला पाहिजे, अस ठाम मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांबद्दल असं पुन्हा पुन्हा बोलू नये.
कोणत्याही पक्षाच्या नेत्यानी देखील सांभाळून बोललं पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले. उद्याचा महाविकास आघाडीचा मोर्चा ऐतिहासिक आहे, असं म्हणत बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीच्या मोर्चाला समर्थनच दिलेल आहे. तीन लाखांहून अधिक कार्यकर्ते जमवण्याचे लक्ष्य “महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल” या घोषवाक्याखाली महाविकास आघाडी रस्त्यावर उतरत आहे. यासाठी शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी कार्यकर्त्यांना जमवण्यासाठी तयारीला सुरुवात केली आहे.
प्रत्येक पक्षाने एक लाखाचं टार्गेट ठेवून जवळपास तीन लाखाहून अधिक कार्यकर्ते जमवण्याचे लक्ष्य ठेवलं आहे. या ऐतिहासिक विराट मोर्चासाठी तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरु झाल्या आहे. त्यासोबतच कार्यकर्त्यांना जमवण्यासाठीही प्लॅनिंग करायला सुरुवात झाली आहे. एवढं सगळं सुरु असताना परवानगीचं काय?
असा सवाल उपस्थित आहे.
महामोर्चात कोण कोण सहभागी होणार? भायखळ्याच्या रिर्चड्सन क्रुडासपासून सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल, त्यानंतर हा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने येणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीच्या समोर एका ट्रकवरच सभा आयोजित करण्यात येणार आहे.
शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, भाई जगताप आणि इतर नेते उपस्थित असतील. तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि शरद पवार सुद्धा येण्याची शक्यता आहे. डावे पक्ष सुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चाला सपा, सीपीआय, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा पाठिंबा महाविकास आघाडीच्या या मोर्चाला समाजवादी पक्षापासून सीपीआय, मराठा क्रांती ठोक मोर्चा या संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यपाल हटाओपासून शिवाजी महाराजांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याबाबतच्या मागण्या मोर्चात पाहायला मिळणार आहेत.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….