’12 दिवसांमध्ये प्रश्न सुटतील का….?’ 19 ते 30 डिसेंबरदरम्यान हिवाळी अधिवेशन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन १९ ते ३० डिसेंबर या कालावाधीमध्ये होत आहे. परंतु या १२ दिवसांमध्ये प्रश्न सुटतील का? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे.
सीमावाद, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर मुद्द्यांसाठी तीन आठवड्यांचं अधिवेशन व्हावं, अशी महाविकास आघाडीतील नेत्यांची मागणी आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, अधिवेशन तीन आठवड्यांचं व्हावं, अशी मागणी मागणी आहे. कोरोना कालावधीमध्ये अधिवेशनाचा कालावधी कमी होता. शिवाय ते नागपूरला झालंच नव्हतं. या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, सीमाप्रश्न आणि विदर्भ-मराठवाड्याचे प्रश्न घेऊन आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत. परंतु कालावधी अपुरा आहे.
यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आवश्यकता असल्यास अधिवेशनाचा कालावधी आठवड्याभराने वाढणार असल्याचं म्हटलं आहे. २९ डिसेंबरला होणाऱ्या बैठीकीत यावर विचार होऊन, प्रश्न मांडण्यासाठी कालावधी कमी पडला, असे वाटल्यास अधिवेशनाचा कालावधी वाढेल, असं ते म्हणाले आहेत.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…