मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री अचानक दिल्ली दौऱ्यावर, राजकीय घडामोडींना वेग…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ठाकरे एकीकडे ठाकरे विरुद्ध शिंदे गटात आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरु आहे तर दुसरीकडे सत्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा संघर्ष पाहायला मिळतोय.
त्यातच भर म्हणजे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून अस्थिरता निर्माण झाली आहे. अशातच महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सीमावादाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
शिंदे आणि फडणवीस हे उद्या दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे या बैठकीला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलंय. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झालाय.
या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची ठरणार आहे. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमानिमित्ताने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस काल गुजरातला गेले होते. या कार्यक्रमाला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे देखील उपस्थित होते. या दरम्यान अहमादाबाद विमानतळातील विशेष कक्षात शिंदे-फडणवीस आणि बोम्मई यांच्यात भेट झाल्याची माहिती समोर आली होती. पण नेमकी काय चर्चा झाली, याबाबत माहिती समोर आली नव्हती.

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….