मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा मंदावली, हिवाळी अधिवेशनात २१ विधेयके मांडली जाणार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाचे बिगुल वाजले असून मंगळवारी मुंबईत झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत दोन आठवड्याचा (१० दिवस) कार्यकाळही निश्चित करण्यात आला आहे.
अधिवेशनात २१ विधेयके मांडली जाणार असून त्यावर चर्चा अपेक्षित आहे. दरम्यान, विधिमंडळ इमारत परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
विधिमंडळ सचिवालयाने अधिवेशनाच्या कामकाजासंदर्भात काढलेल्या तात्पुरत्या दिनदर्शिकेनुसार पहिल्या दिवशी (१९ डिसें.) दोन्ही सभागृहात अध्यादेश पटलावर ठेवणे, पुरवणी मागण्या सादर करणे, मंगळवार, बुधवारी शासकीय कामकाज, गुरवारी पुरवणी मागण्यांवर चर्चा, शुक्रवारी पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान आणि पुरवणी नियोजन विधेयक अशा स्वरुपाच्या कामकाजाचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, सीमावाद, थोर पुरुषांबाबत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केलेली आक्षेपार्ह वक्तव्ये पाहता पहिले दोन दिवस या मुद्यांवर दोन्ही सभागृहात वादंग होण्याची शक्यता आहे.
विधानभवनात सोमवारपासून वर्दळ वाढली आहे. प्रवेशद्वारावर सुरक्षा सैनिक तैनात करण्यात आले असून ओळखपत्र तपासूनच आत सोडले जात आहे. विधानभवनाकडे जाणाऱ्या मार्गावर सुरक्षा कठडे लावण्यात आले आहे. रविवारी सर्व मंत्री नागपुरात दाखल होतील.
हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये दिवाळीत केली होती. त्यानंतर इच्छुकांच्या नावांबाबत चर्चाही सुरू झाली. आता हिवाळी अधिवेशन तोंडावर आले तरी यावर कोणाही चर्चा करीत नाही. सध्या हा विषय मागे पडल्याचेच चित्र आहे.
नामफलकांची रंगरंगोटी
अधिवेशनानिमित्त सचिवालयात सुरू होणाऱ्या शासनाच्या विविध विभागाच्या नावांच्या पाट्याची रंगरंगोटी केली जात आहे. मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर मंडप टाकण्यात येत असून रस्ते दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे.

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….