सीमावादाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार बेळगावात…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बेळगाव :- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काही दिवसांपूर्वी खळबळजनक वक्तव्य केलं होतं. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर आणि काही गावांवर आपला दावा सांगितला होता.
त्यानंतर राज्यभर या सीमावदाचे पडसाद दिसून आले होते. काही दिवस बस बंद ठेवण्यात आल्या. त्यानंतर राज्याचे दोन मंत्री कर्नाटकात चर्चेसाठी जाणार होते त्यांना येऊ नका म्हणून सांगण्यात आले.

अशातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार कर्नाटकच्या दौऱ्यावर गेले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सध्या बेळगावात आहेत. बेळगावमध्ये जात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आहे. त्यानंतर त्यांनी चळवळीचे केंद्रस्थान असलेल्या येळ्ळूर गावास भेट देऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले आहे. या दौऱ्याचे फोटो आणि व्हिडिओ रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाला रोहित पवार यांनी भेट दिली आहे. रोहित पवार यांनी यावेळी बेळगावातील मराठी बांधवांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मागच्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. दोन्ही राज्यांच्या भूमिका आणि दोन्ही बाजूने टीका यामुळे वाद निर्माण होत असतानाच रोहित पवार यांचा हा बेळगाव दौरा महत्वाचा मानला जात आहे.

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….