“नोटबंदी, जीएसटी धोरणे नाही, तर लहान व्यापाऱ्यांना.” , राहुल गांधींचे मोदी सरकारवर टीकास्त्र….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बुऱ्हाणपूर :- सात राज्यांतून १४७० किलोमीटरचा प्रवास करून काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली ‘भारत जोडो यात्रा’ने बुधवारी सकाळी महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात दाखल झाली. महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर बोदर्ली गावात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्याकडे यात्रेचा ध्वज सुपूर्द केला.
यानंतर मध्यप्रदेशमधून हिंदी पट्ट्यात यात्रेचा प्रवास सुरु झाला आहे.
बुऱ्हाणपूर येथील जाहीर सभेला राहुल गांधी यांनी संबोधित केलं. तेव्हा नोटबंदी, जीएसटी, महागाई, अग्निपथ योजना, सरकारी संस्थाचे खासगीकरणावरून राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकावर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, या यात्रेत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधीही कुटुंबासह बुऱ्हाणपूरमध्ये सामील झाल्या होत्या.
राहुल गांधी म्हणाले, “नोटंबदी आणि जीएसटी ही धोरणे नाहीत, ती शस्त्रे आहेत. ही शस्त्रे लहान व्यापारी, शेतकरी, मजूर यांना मारण्यासाठी वापरली जात आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. भारतीय सरकार आणि लष्कर यांच्यात एक पवित्र नातं होतं. पण, आता नरेंद्र मोदींच्या ‘अग्निपथ’ योजनेमुळे हे नातं तुटलं आहे. कारण, ‘अग्निपथ’ सैन्यातील मुले चार वर्षानंतर ते बेरोजगार होतील.”
गॅसच्या किंमती गगनाला भिडल्यावरूनही राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीका केली. “यूपीए सरकारच्या काळत गॅसचे दर किती होते?” चार बोटे दाखल राहुल गांधी म्हणाले, “४०० रुपये. पण, आता किंमत किती रुपये आहे? दोन्ही हात वापरूनही ते दाखवू शकत नाही,” असे राहुल गांधी यांनी सांगितलं.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….