येत्या दीड महिन्यात चिंचोली संगम येथील रस्त्याचे काम पूर्ण करा ; रिपब्लिकन युवासेना व ग्रामस्थांनी दिला निर्वाणीचा इशारा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उमरखेड :- मागील आठ ते दहा महिन्यापासून वेळोवेळी पाठपुरावा करून निवेदन देऊन तथा आंदोलन करून सुद्धा प्रशासनाच्या उदासीन मानसिकता व ढिसाळ कार्यपद्धती तसेच कंत्राटदाराच्या निर्ढावलेपणा मुळे ३१/०५/२०२२ तारखेची मुदत देऊन सुद्धा वेळेत कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नसल्याकारणाने सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावे

या मागणीसाठी रिपब्लिकन युवा सेना व चिंचोली (संगम) ग्रामस्थ यांच्या मार्फत उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरखेड येथे ०१/०६/२०२२ रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले होते त्यानंतर काही काळ संबंधित कंत्राटदाराकडून रस्त्याच्या कामास सुरुवात केल्याचे दर्शवुन ग्रामस्थ व प्रशासनाची दिशाभूल करण्याचे काम अद्याप चालु आहे. रस्त्याअभावी ग्रामस्थांच्या होणाऱ्या गैरसोयीचे गुऱ्हाळ या पुर्वीही प्रशासनासमोर गाऊन झाले असुन, येत्या दिड महिन्याच्या आत चिंचोली (संगम) येथील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरनाचे काम पूर्ण न झाल्यास ग्रामस्थ व रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने सदर प्रकरणी संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून तसेच संबंधित विभागाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात येऊन प्रशासनाच्या ढिसाळ कार्यपद्धतीच्या निषेधार्थ तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा निवेदनामार्फत प्रशासनास इशारा देण्यात आला.

यावेळी सुनिल पाटील चिंचोलकर, शुद्धोधन दिवेकर, बंडू साखरे, शेख मिनाज, विवेक जळके, विलास धुळे, किरण दवणे, मेजर संभाजी हापसे, संदीप राऊत, साहेबराव कदम, संदीप राऊत, दिलीप मुनेश्वर, कैलास खडसे, प्रल्हाद आगीरे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….