राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ रुग्णालयात दाखल…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एकीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भुजबळ यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
छगन भुजबळ यांना मागील तीन दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत आहे. त्यामुळेच त्यांना आज मुंबईतील रुग्णालयात दाखल केलं असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी दिली आहे. सध्या भुजबळ यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात गर्दी करू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे विविध कार्यक्रमात मास्क वापरत असल्याचे दिसून येत होते. आज अस्वस्थ वाटू लागल्याने तसेच दिवसांपासून व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. आज संध्याकाळीचं रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचे माहिती आहे.
शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती खालावल्याने 31 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील आठ दिवसांपासून शरद पवार यांच्यावर ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरु होते.
त्यानंतर आज सकाळी वाजता शरद पवार यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर सकाळी साडे दहा वाजता शरद पवार मुंबईतील आपल्या सिल्वर ओक या निवासस्थानी रवाना झाले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….