नवनीत राणांवर कारवाई का नाही…? तुम्ही मॅनेज झाले का…? कोर्टाने पोलिसांना झापलं….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अमरावतीच्या खासदार या ना त्या प्रकरणामुळे कायम चर्चेत असतात. अशातच बोगस जात पडताळणी प्रकरणामध्ये नवनीत राणा यांच्या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू आहे.
यावेळी ‘कारवाई का होत नाही? आरोपी महाराष्ट्रातच आहे? पोलीस मॅनेज झाले का?’ असं म्हणत न्यायाधीशांनी पोलिसांना झापून काढलं. खासदार नवनीत राणा यांचं बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात आज सुनावणी झाली.
यावेळी कोर्टाने पोलिसांना खडेबोल सुनावले.
तक्रारदार जयंत वंजारी यांनी कोर्टाने नवनीत राणा विरोधात जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटवर पोलीस कारवाई करत नसल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणलं. त्यावर न्यायाधीशांनी पोलीस मॅनेज झाले का? असा सवाल केला.
कोर्टाने फटकारल्यानंतर, मुलुंड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांनी नवनीत राणा प्रकरणात कारवाई साठी वेळ मागितला. मात्र न्यायालयाने नाराजी व्यक्त करत म्हटलं की, न्यायालयाच्या आदेशाचा पालन होताना इथं दिसत नाही. कारवाई का होत नाही? आरोपी महाराष्ट्रातच आहे?
असं म्हणत पुन्हा एकदा झापून काढले. तसंच, न्यायालयाने पोलिसांनी अधिक वेळ देण्याची केलेली विनंती नाकारली.
या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्त आणि लोकसभा अध्यक्ष यांना सदर प्रकरणाबाबत पत्र लिहिण्याची पोलिसांना सूचना केली आहे. त्याचबरोबर संबंधित पोलीस उपायुक्त यांना या संदर्भात तातडीने कारवाई अहवाल सादर करण्याचा निर्देश दिले आहे. नवनीत राणा यांच्या प्रकरणात पुढील सुनावणी 28 नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….