‘हा गुजरात मी बनवला आहे’ ; विधानसभा निडणुकीसाठी मोदींकडून नवे घोषवाक्य, भाजपाच्या प्रचाराला सुरूवात.….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अहमदाबाद :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वलसाड जिल्ह्यातील कपराडा येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी गुजरात निवडणुकीसाठी “हा गुजरात मी बनवला आहे” असे नवे घोषवाक्य दिले आहे.
तसेच या निडणुकीत गुजरातला बदनाम करणाऱ्या पक्षांचा पराभव होईल, असेही ते म्हणाले.
“काही पक्ष गेल्या २० वर्षांपासून गुजरातला बदनाम करण्याचे कारस्थान रचत आहेत. यापूर्वीही गुजरातमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. यावेळीही त्यांचा दारुण पराभव होईल, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसचे नाव न घेता केली आहे. तसेच यंदाच्या निडणुकीतही भाजप विक्रमी फरकाने जिंकून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मी गुजरात निडणुकीच्या प्रचारासाठी तयार आहे. मला शक्य होईल तेवढा वेळ मी प्रचारासाठी देईन”, अशी असेही ते म्हणाले.
दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून ही निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबरला, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबरला होणार आहे. तसेच निकाल ८ डिसेंबरला जाहीर होणार आहे. गेल्या २५ वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…