गुजरात निवडणूक लढवू नका, आम्ही…’ ; भाजपने ऑफर दिल्याचा अरविंद केजरीवालांनी केला गौफ्यस्पोट…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- आगामी विधानसभा निवडणुकीआधीच गुजरातमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. आम आदमी पक्षाने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. गुजरातमध्ये ‘आप’चा वाढता प्रभाव लक्षात घेता भाजपकडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न दिसून येत आहे अशी चर्चा आहे.
याचदरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर एका वृत्तवाहिनी बोलताना गंभीर आरोप केले आहेत. केजरीवालांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
केजरीवाल म्हणाले, ‘भाजपने मला ऑफर दिली आहे की, गुजरात निवडणूक लढवू नका. आम्ही सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया सोडून देऊ. तर केजरीवाल यांनी सिसोदिया यांच्याबाबत देखील धक्कादायक माहिती सांगितली. ‘सीबीआयने देखील मनीष सिसोदिया यांची चौकशी कमी केली. मात्र, त्यांना वारंवार केजरीवाल यांची साथ सोडा, तुम्हाला मुख्यमंत्री बनवू. सीबीआयने हे वारंवार सांगितलं आहे’, असे केजरीवाल म्हणाले.
केजरीवाल यांनी गुजरात सरकारवर जोरदार टीका केली. गेल्या काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये पूल पडला. त्यावरून राज्यात भ्रष्टाचार किती होतोय? दिसून येत आहे. मोरबी पूल दुर्घटनेतील दोषींना वाचवलं जात आहे. घड्याळ बनवणाऱ्या कंपनीला पुलाच्या नूतनीकरणाचे कंत्राट देण्यात आले होते. त्या कंपनीचा मालक फरार आहे. तक्रारीत त्यांचे नाव घेण्यात आले नाही? असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला.
दिल्लीतील प्रदुषणावर भाष्य करताना केजरीवाल म्हणाले, ‘दिल्लीत प्रदुषण वाढत आहे. परंतु त्यात सुधारणा होत आहे. आगामी गुजरात विधानसभेवर भाष्य करताना केजरीवाल म्हणाले, ‘गुजरातमधील लोकांना आता राज्यात परिवर्तन आहे. गुजरातमधील लोक भाजपच्या कारभाराला वैतागले आहेत. गेले २७ वर्ष महागाईमुळे लोक भाजपला वैतागली आहेत. त्यामुळे यंदा आगामी विधानसभा निवडणुकीत जनता आम आदमी पक्षाला मतदान करतील’.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….