अमरावतीत बच्चू कडूंचा प्रहार मेळावा, मेळाव्यात ‘मै झुकेंगा नही’ चे पोस्टर…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- अमरावती येथील प्रहार पक्षाचे बच्चू कडू आणि स्वाभीमान पार्टीचे रवी राणा यांचा वाद मिटण्याची शक्यता होती. रवी राणा यांनी त्यांचे शब्द माघार घेतले आहेत.
यावेळी, बच्चू कडू यांनी कार्यकर्ते आणि इतारांशी चर्चा करुन त्यांची भूमिका स्पष्ट करेल, असं सागितलं होतं. अशातच आज अमरावती येथे प्रहार मेळावा आयोजित करण्यात आला असून बच्चू कडू यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये बच्चू कडूंचे मोठे पोस्ट लावण्यात आले आहेत. या पोस्टरवर मै झुकेंगा नही, असं लिहिण्यात आलं आहे. या पोस्टरांमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
राणा यांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, बच्चू कडू (bacchu kadu) यांनी आपले शब्द मागे घेतले नसून वाद मिटल्याचं देखील स्पष्टपणे सांगितलं नाहीये. एवढंच नाही तर ज कार्यकर्त्यांशी चर्चा करू आणि उद्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भूमिका जाहीर करू, असं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे नेते आहेत. त्यांनी मला बोलवल्यानंतर ३ साडे तीन तास मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. काही विचार, भाषा न पटणारी होती त्यावर देखील चर्चा झाली. बच्चू कडू आणि मी आम्ही दोघे ही सरकारसोबत आहे. जे आमदार आहेत ते सुध्दा माझे सहकारी आहेत. गुवाहाटी संदर्भात काही वाक्य निघाले असतील तर ते मी मागे घेतो. पण ज्या पध्दतीने बच्चू कडू यांनी जे वक्तव्य केलं ते न पचणारे होते. मला बच्चू कडू यांच्याकडून अपेक्षा आहे की, ते सुध्दा त्यांचे शब्द मागे घेतील, असं रवी राणा यांनी म्हटलं होतं.
शिंदे यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घेतल्याचे सांगितले. तर बच्चू कडू लवकरच त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….