मोठी बातमी..! गॅस सिलिंडरच्या दरात 115 रुपयांची घट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महिन्याच्या पहिल्याच दिवशी लोकांना दिलासा देणारी बातमी आहे. आज 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 115.50 रुपयांनी कमी झाली आहे. मात्र, 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
या दरात कपात केल्यानंतर राजधानी दिल्लीत १९ किलो गॅस सिलिंडरची किंमत १७४४ रुपयांवर आली आहे. त्याच वेळी, कोलकाताची किंमत 1846 रुपये, मुंबईची किंमत 1696 रुपये आणि चेन्नईची किंमत 1893 रुपये आहे.
सलग पाचव्या महिन्यात किमतीत कपात
यापूर्वी राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1859.50 रुपये होती. कोलकात्याची किंमत 1959 रुपये, मुंबईची किंमत 1811.50 रुपये आणि चेन्नईची किंमत 2009.50 रुपये होती. ऑक्टोबर महिन्यातही 25.50 रुपयांनी दरात कपात करण्यात आली होती. सप्टेंबर महिन्यात 91.50 रुपयांची घट झाली होती. ऑगस्ट महिन्यात 36 रुपयांची घट झाली होती. जुलै महिन्यात 8.50 रुपयांची घट झाली होती. अशाप्रकारे, हा सलग पाचवा महिना आहे जेव्हा व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे.
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल नाही
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 1053 रुपये, कोलकात्यात 1079 रुपये, मुंबईत 1052 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये आहे. 6 जुलै रोजी किंमत शेवटची बदलली होती. त्या दिवशी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….