यवतमाळमध्ये ठाकरेंना दुसरा धक्का…! मंत्री राठोडांविराधोत आंदोलन करणारेच शिंदे गटात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ/मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर यवतमाळ शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता.
वैयक्तिक कारणाने पद सोडत असून पुढील राजकीय वाटचालीबद्दल तूर्त कोणताही निर्णय घेतला नसल्याचे पिंगळे यांनी याबाबत जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले होते. अखेर दीड महिन्यानंतर शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख पराग पिंगळे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे पाहायला मिळाले. पराग पिंगळे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी आपण शिवसैनिकच असल्याची त्यांनी कबुली दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला त्यांनी पसंती दिली. पालकमंत्री संजय राठोड यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. आजच शिंदे गटात जाणार असल्याचंही त्यांनी सांगितले. त्यामुळे आमदार संजय राठोड यानंतर शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
आधी राठोड यांना विरोध नंतर त्यांच्यातच सहभागी शिवसेनेतील बंडाळीनंतर आमदार संजय राठोड शिंदे गटात सामील झाले. राठोड यांचे निकटवर्तीय अशी पराग पिंगळे यांची ओळख होती. त्यामुळे पिंगळे हेही शिवसेना सोडतील, असा अंदाज वर्तविला जात होता.
मात्र, त्यानंतरही दोन महिने ते सेनेतच कार्यरत होते. राठोड यांच्याविरोधात झालेल्या आंदोलनातही जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर आणि जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्यासोबत पिंगळे हेही सहभागी झाले होते. एवढेच नव्हे तर मातोश्रीवर झालेल्या बैठकीतही पिंगळे यांचा वेळोवेळी सहभाग होता. मात्र, मागील काही दिवसांपासून पिंगळे पक्षाच्या कामापासून दूर होते.
इतकेच नव्हे तर त्यांनी स्वत:च्या वाहनावर असलेला शिवसेनेचा वाघसुद्धा काढून टाकला. त्यामुळेच पिंगळे शिवसेना सोडणार हे पक्के झाले होते. राजकीय निर्णय घेताना पिंगळेंनी भाजपसोबत जायचे की शिंदे गटातील स्थानिक नेते संजय राठोड यांच्याशी पुन्हा जुळायचे, यावर अजून निर्णय झालेला नव्हता. दरम्यान, गौरी पूजनाच्याकाळात मंत्री संजय राठोड यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही पिंगळे यांच्या घरी भेट दिली. तेव्हापासूनच पिंगळे शिवसेनेबाहेर पडणार हे स्पष्ट झाले होते. आता पिंगळे यांच्यासोबत किती समर्थक शिंदे गटात सहभागी होतात, हे पाहावं लागणार आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….