महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, 16 आमदारांचं काय होणार….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- राज्याच्या राजकारणासाठी मंगळवार 1 नोव्हेंबर महत्त्वाचा दिवस आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात मंगळवारी (1 नोव्हेंबर) सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुनावणी होणार आहे.
सुभाष देसाई (Shubhash Desai) यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याबाबत ही याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनापीठापुढे ही सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीत खटल्यासंदर्भात कालमर्यादा निश्चित केली जाऊ शकते.
ठाकरे गटाकडून कपील सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी हे ज्येष्ठ वकील बाजू मांडणार आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या वतीने संजय किशन कौल हे युक्तीवाद करणार आहेत. केंद्र सरकारच्या वतीने महाधिवक्ते तुषार मेहता बाजू मांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे उभ्या राज्याचं लक्ष असणार आहे. तसेच या 16 आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेतं हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….