50 खोक्यांच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचं बंगाल धाडीचं लॉजिक, 27 कोटीला ट्रक लागला मग 50 कोटींना…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिंदे गट शिवसेनेतूनफुटल्यापासून ठाकरे गट त्यांच्यावर सडकून टीका करत आहे.
यातील मुख्य आरोप 50 कोटी अर्थात 50 खोके घेतल्याचा आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांनीच शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांच्यावर 50 खोके घेतल्याचा आरोप केला. यामुळे वातावरण आणखी चिघळले आहे. यावर आता खुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच प्रतिक्रिया दिली आहे.
पश्चिम बंगालमध्ये धाड पडली तेव्हा 27 कोटी रुपयांसाठी टेम्पो लागला. मग 50 कोटींचे ट्रक का दिसले नाही? लोकांची दिशाभूल करू नका, पैशाच्या लालसेपोटी हे 40 आमदार माझ्यासोबत आले नाहीत. या पनान्स लोकांना बदनाम करण्याचं काम तुम्ही कराल तेवढं खड्यात लोक तुम्हाला टाकतील, जनाची नाही तर मनाची ठेवा.
यामुळे शिवसैनिकांचं खच्चीकरण होत असल्याचा पलटवार मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. नंदूरबार येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. विरोधकांना मी कामातून उत्तर दिलं : मुख्यमंत्री औद्योगिक प्रकल्प गुजरातमध्ये जात आहे यावरून जो काहूर माजला आहे, त्याला योग्यवेळी घटनांनी स्वतः उत्तर देईल, सध्या उद्योगमंत्री याबाबत बोलत आहेत. विरोधकांना मी कामातून उत्तर दिलं आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? प्रत्येक प्रकल्प वेळेआधी करण्याचा माणस आहे, 72 मोठे निर्णय या सरकारने घेतले. सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना मदत केली. परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मदतीसाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. 3 मिनिटात स्टेजवरून नगरपालिकेचे 7 कोटी 28 लाख देणारे हे गतिमान सरकार आहे.
बंद जल सिंचन प्रकल्पांना चालना दिली. यामुळे अनेक हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे. सर्व सामन्याची दिवाळी गोड व्हावी यासाठी 7 कोटी लोकांना 100 रुपयात आनंद शिधा दिला. हे सरकार काम करणार सरकार आहे, एकाच योजनेचे 15000 कोटी दिले.
गेले अडीच महिने आणि अडीच वर्षांच्या कामाचा लेखाजोखा पाहून अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यामुळे अनेक कामाला लागले, याचं प्रमुख कारण हा एकनाथ शिंदे आहे. जर आम्ही चुकीचा निर्णय घेतला असता तर लोकांनी आमच्याकडे पाठ फिरवली असते. धर्मवीर चित्रपटात एक डायलॉग आहे, गद्दरांना क्षमा नाही, ज्यांनी बाळासाहेब यांच्या विचारांशी गद्दारी केली त्यांना क्षमा नाही, बाळासाहेब ठाकरे आणी मोदींचे फोटो लावून मते मागितली, मग गद्दारी कोणी केली.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….