‘धर्म धोक्यात येत नसतो, धोक्यात येतो तो नेता….!’ बच्चु कडू यांचं विधान चर्चेत…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ज्यात एकनाथ शिंदे आणि आमदारांनी बंड केल्यानंतर 50 खोके एकदम ओके अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली. त्यानंतर आता बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातही याच वाक्यावरून चांगलीच जुंपली.
आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद आता चांगलाच पेटलेला दिसून येतोय. यांचा वाद मिटवण्यासाठी यांच्यात आता एकनाथ शिंदे मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. रवी राणा आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
त्याचबरोबर हा वाद कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे. त्याचबरोबर बच्चू कडू यांनी यवतमाळमध्ये बोलताना एक वक्तव्य केलं ते चर्चेत आलं आहे. ‘धर्म कधीच धोक्यात येत नसतो, धोक्यात येतो तो नेता!’, कुणाचंही नाव न घेता असं बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू यांनी हा टोला नक्की कुणाला लगावला? याबाबत चर्चा झाली. बच्चु कडू यांनी हा टोला रवी राणा यांना लगावल्याचं बोललं जातंय.
बच्चू कडू बोलताना म्हणाले की, मी 15 वर्ष मेहनत केली. दिव्यांगांसाठी काम केलं. 150 गुन्हे दाखल करून घेतले. सत्ता हा महत्वाचा विषय नाही. लोकांचे प्रश्न सुटायला हवेत. कार्यकर्ते हे सेवेच्या भावनेतून पेटून उठला पाहिजे. दोन शाखा कमी करा, पण मजबूत शाखा तयार करा, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
पुढे बोलताना त्यांनी म्हंटलं की, फुकटची प्रसिद्ध म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा आहे. हनुमान चालीसा म्हणता येत नाही. तरी चालले तिकडं हनुमान चालीसा म्हणायला. अशावेळी हनुमानने गदा मारली मागून तर समजेल यांना, असं म्हणत त्यांनी रवी राणा यांना टोला लगावला आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….