हेट स्पीच केस प्रकरणात आझम खान यांना 3 वर्षांची शिक्षा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कानपूर :- समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आणि रामपूरचे आमदार आझम खान यांना गुरुवारी रामपूर न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हेट स्पीच प्रकरणी ही शिक्षा ठोठवण्यात आली आहे.
तसेच 25 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. खान यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याने त्यांचे विधानसभेचे सदस्यत्वदेखील रद्द होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आझम खान हे रामपूरमधून 10 वेळा आमदार राहिले आहेत आणि सपाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. अशा स्थितीत त्यांची आमदारकीदेखील रद्द होण्याची चिन्ह व्यक्त केली जात आहे, असे झाल्यास समाजवादी पक्षासाठी हा फार मोठा धक्का असेल. अयोध्येतील गोसाईगंज येथील भाजप आमदार खब्बू तिवारी यांचे सदस्यत्वही न्यायालयाने दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा सुनावल्यानंतर रद्द केले होते.
प्रकरण नेमकं काय?
हेट स्पीटशी संबंधित हे प्रकरण 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील असून, 27 जुलै 2019 रोजी भाजप नेते आकाश सक्सेना यांनी आझम खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. आझम खान यांनी रामपूरच्या मिलक विधानसभा मतदारसंघात जनतेला संबोधित करताना पीएम मोदी आणि सीएम योगी यांच्यावर आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप आहे. याशिवाय अन्य आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. तिन्ही आरोपांमध्ये खान दोषी आढळल्याने आज त्यांना न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….