”दोन महिन्यात शिंदे-फडणवीस सरकार पडणार अन् महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येणार”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप सत्र सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी मोठं विधान केलं आहे. दोन महिन्याभरात शिंदे-फडणवीस सरकार उलटणार आणि महाविकास आघाडी सरकार पुन्हा सत्तेत येणार असल्याचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली यांनी केलं आहे.
रूपाली पाटील या बारामतीत गोविंद बाग या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आल्या होत्या त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, ‘शंभुराज देसाई म्हणतात पुढचे 25 वर्ष राष्ट्रवादीची सत्ता येणार नाही. पण त्यांनी 25 वर्षाच्या सत्तेची भाषा करू नये, मुळात आत्ताच जे सरकार सत्तेत आलंय ते शिंदे-फडणवीस हे सरकार छळकपट हिटलरशाही आणि दबाव यंत्रणांचा वापर करुन आलं आहे. त्याचबरोबर महिना दोन महिन्यांमध्ये काय परिस्थिती होतेय ते बघा. हे सरकार परत उलटणार आणि महाविकास आघाडी परत सत्तेत येणार असंही त्या म्हणाल्यात.
त्या पुढे म्हणाल्या की, आमदार सांभाळणं महाराष्ट्राचा कारभार सांभाळणं तेवढं सोप्प नाही ते फक्त अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनीच चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या काळामध्ये सिद्ध करून दाखवलं होतं. राज्य सांभाळनं एकनाथ शिंदे यांना जमणार नाही असंही रुपाली ठोंबरे म्हणाल्या आहेत.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….