भाजपची नवी रणनीती ; तिकीट वाटपात शहांची मोठी घोषणा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरात राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे.
गुजरात विधानसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपकडून 25 टक्के तिकीटे नवीन चेहऱ्यांना देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तिकीट देताना उमेदवाराची विजयी क्षमता विचारात घेतली जाईल. रविवारी संध्याकाळी वडोदरा येथे त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
गुजरात राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी रणनीती आखली आहे. तिकिटासाठी उमेदवाराची विजयी क्षमता हा एकमेव निकष आहे. पक्षाचे संसदीय मंडळ उमेदवार निश्चित करेल. पक्ष नव्या चेहऱ्यांना किमान 25 टक्के तिकीट देईल. म्हणजेच गुजरात निवडणुकीत भाजप ४५ ते ४६ नव्या चेहऱ्यांना तिकीट देऊ शकते.
पक्षात इतर उमेदवारांच्या तुलनेत जिंकण्याची क्षमता असेल तर पक्ष तीन-चार वेळा निवडून आलेल्या उमेदवारांना तिकीट देऊ शकतो. राज्यात विधानसभेच्या 182 जागा आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 99 जागांवर विजय मिळवला होता. अस अमित शहांनी यावेळी सांगितलं.
तसेच, आप’ मुळे काँग्रेसच्या मतांमध्ये घसरण होईल. त्याचा भाजपला फायदा होईल. गेल्या निवडणुकीत भाजपने पाच हजारांपेक्षा कमी फरकाने सुमारे 35 जागा जिंकल्या होत्या. 2022 च्या निवडणुकीत आपच्या उपस्थितीने या 35 जागांवर भाजपचे मताधिक्य वाढेल. भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होईल. जनता भाजपला सत्तेत आणण्यासाठी मतदान करेल आणि काँग्रेस विरोधात राहील, असा विश्वासही अमित शहांनी व्यक्त केला.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….