‘मुख्यमंत्री शिंदेंनाही भाजपतच विलीन व्हावे लागेल….?’
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेमध्ये (Shiv Sena) फुट पडल्यापासून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेतून ४० आमदार आणि १२ खासदार फुटले आहेत. त्यानंतर आता शिंदे गटात गेलेले तब्बल १२ आमदार नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
त्यातील बहुतांश आमदार भाजपत (BJP) विलीन होण्याची शक्यता असल्याचा उल्लेख ‘सामना’तल्या रोखठोक सदरात भाजप नेत्याच्या हवाल्याने करण्यात आली आहे.
शिंदे यांचा रामदास आठवले होईल, असाही उल्लेख या सदरात करण्यात आला आहे. रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘सामना’तल्या रोखठोक सदरातून शिंदे गट आणि एकनाथ शिंदेंना लक्ष्य करण्यात आले आहे. रोखठोकमध्ये म्हटले आहे की ‘शिंदे यांचे मुख्यमंत्री पद ही भाजपने केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. त्यांची मुख्यमंत्रीपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, असा टोलाही लगावला आहे. शिंदे यांच्या ‘तोतया’ गटास अंधेरी पूर्वच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उतरवायला हवे होते, पण भाजपनेच ते टाळले.
तसेच महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे (Eknath Shinde) गटाचा दावा खोटा आहे, असा आरोपही करण्यात आला आहे. शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज आहे. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपमध्ये विलीन करून घेतील, असे स्पष्ट दिसते. त्यानंतर शिंदे यांचे काय होणार, असे मी त्यांच्याच एका नेत्यास विचारले तेव्हा तो त्यांनी सांगितले की ‘शिंदे यांचा रामदास आठवले होईल’ हे विधान बोलके आहे, असे या रोखठोख सदरामध्ये म्हटले आहे.
शिंदे यांनी स्वतःबरोबर महाराष्ट्राचे नुकसान केले. महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत आहे. भाजपचे नेते सरळ सांगतात, ‘शिंदे यांनाही उद्या भाजपमध्येच विलीन व्हावे लागेल. त्या वेळी ते नारायण राणे यांच्या भूमिकेत असतील.’ असे घडले तर शिंदे यांनी काय मिळवले? असा रोखठोख सवालही या सदरामधून करण्यात आला आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….