शिंदे-फडणवीस यांचे टेन्शन वाढवणारी बातमी…! गुवाहाटीवरुन आमदारांमध्ये वाद, थेट पोलिस ठाण्यात तक्रार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिंदे गटाचे आमदार शाहजी बापू पाटील यांच्या काय झाडी, काय डोंगर या डायलॉगमुळे गुवाहाटी चांगलेच चर्चेत आले. ते च गुवाहाटी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे ते शिंदे-फडणवीस सरकारला पाठींबा देणाऱ्या अपक्ष आमदारांमुळे.
गुवाहाटीवरुन झालेल्या आरोपांमुळे आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. बच्चू कडू यांनी रवी राणांविरुद्ध थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदारांची अंतर्गत धुसपूस आता चव्हाट्यावर आली आहे.
आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. आमदार बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्या विरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
गुवाहाटी ला जाऊन करोडो रुपये लाटले असा आरोप रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केला होता. या आरोपांवरुनच बच्चू कडू यांनी तक्रार दाखल करत रवी राणा विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
रवी राणा यांनी माझी बदनामी केली आहे. 20-20 वर्ष आमची राजकिय करिअर उभं करायला गेली. मी पैसे घेऊन जर गुवाहाटीला गेलो असेल तर पैसे देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदेजी यांनी यांनी याचे उत्तर दिले पाहिजे.
या संदर्भात मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील नोटीस पाठवणार आहे. तुम्ही पैसे दिले असेल तर स्पष्ट करा अशी मागणी या नोटीसद्वारे करणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
आमदार रवी राणा यांनी आरोप केले तर पुरावे द्यावेत. हे आरोप अत्यंत गंभीर आहेत. एकीकडे मंत्री पद मागता आणि दुसरीकडे रांगेत लागतात.
आरपारची लढाई लढायला मी तयार आहे. जिथे म्हणाल तिथे एकटा यायला तयार आहे. काय तोडपानी केलं त्याचे एक तारखे पर्यंत पुरावे द्या आणि आरोप सिद्ध करा. आरोप सिद्ध झाले नाहीत तर मी त्यांच्या घरी भांडे घासेन असे देखील बच्चू कडू म्हणाले.
मंत्री मंडळात स्थान न मिळाल्याने आधीच बच्चू कडू नाराज आहेत. त्यातच राणा यांच्या आरोपांमुळे ते चांगलेच संतापले आहेत. यामुळे बच्चू कडू यांची नाराजी शिंदे-फडणवीस सरकारला भारी पडू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….