‘रेवडी संस्कृती’वर पंतप्रधान मोदींचं मोठं विधान; म्हणाले देशातील…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणातील रेवडी संस्कृतीवर पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. मध्य प्रदेशच्या सटाण्यात पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थींना संबोधित करताना मोदी म्हणाले की, देशातील एका मोठ्या वर्गाला रेवडी संस्कृतीपासून मुक्ती हवी आहे.
मोदी म्हणाले की, पूर्वी गरिबांना घर वाटप केल्यानंतर स्वतंत्रपणे शौचालये बनवावी लागत होती. पाणी आणि गॅससाठी सरकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या. शिवाय घरे मनासारखी नसायची. त्यामुळे अनेकांनी घरांमध्ये प्रवेशच केला नाही. मात्र आपण घरमालकाला घर कसं हवं, याचं स्वतंत्र्य दिलं. त्यामुळे आज पंतप्रधान आवास योजना मोठ्या सामाजिक-आर्थिक बदलाचे माध्यम बनत असल्याचं मोदी म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, PMAY अंतर्गत घरांमध्ये वीज, पाणी कनेक्शन आणि गॅस कनेक्शन यासारख्या सर्व सुविधा आहेत. यामुळे लाभार्थ्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे बळ मिळेल. गरिबी हटवण्याचे आधीच्या सरकारांचे प्रत्येक आश्वासन आणि प्रत्येक दावा, केवळ राजकीय नौटंकी होता. ते कोणाच्याही कामी आले नाहीत.
मोदी पुढं म्हणाले की, करदात्याला जेव्हा वाटतं की त्याचा पैसा योग्य ठिकाणी जात आहे, तेव्हा तो आनंदाने कर भरत राहतो. मात्र देशातील मोठ्या वर्गाला आता रेवडी संस्कृती नकोय, असंही मोदी म्हणाले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….