मेलबर्नमध्ये राष्ट्रगीतादरम्यान रोहित भावूक, डोळ्यातून आले अश्रू…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मेलबर्न :- मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 विश्वचषक सामना खेळला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना टीम इंडियाचे सर्व खेळाडू उत्साहात दिसत होते. त्याचवेळी कर्णधार रोहित भावूक झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. रोहित कसेतरी आपल्या भावनांवर आवर घालताना दिसला.
हा सामना जिंकून दोन्ही संघांना आपल्या मोहिमेची सुरुवात करायची आहे. भारताने रविचंद्रन अश्विनचा प्लेइंग 11 मध्ये समावेश केला आहे. युझवेंद्र चहल या सामन्यात खेळत नाही. हर्षल पटेललाही संघात ठेवण्यात आलेले नाही.
आतापर्यंत खेळलेल्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पॉवरप्ले संपला आहे. पहिल्या सहा षटकांत पाकिस्तानने दोन गडी गमावून 32 धावा केल्या. अर्शदीप सिंगने भारताला दोन यश मिळवून दिले. त्याने कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. बाबरला खातेही उघडता आले नाही, तर रिझवानला केवळ चार धावा करता आल्या.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), शान मसूद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, नसीम शाह, हरिस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….