शिंदे सरकार राहणार की जाणार…? या तारखेला होणार सुनावणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- राज्यात गेल्या तीन महिन्यापूर्वी स्थापन झालेले सरकार राहणार की जाणार याचा फैसला 01 नोव्हेंबरला होणार आहे.
सुप्रीम कोर्टाने (Court) राज्यातील सत्तासंघर्षाबाबत 01 नोव्हेंबर पाच खंडपीठासमोर सुनावणी (Hearing) होणार असल्याचे निश्चित केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांच्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचुड, एम आर शाह, कृष्ण मुरारी, हिमा कोहली, पी नरसिंमा यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील सरकार राहणार की टिकणार, सुप्रीम कोर्टात सुनावणी कधी होणार ? अशी चर्चा सुरू होती. शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर सरकार बेकायदेशीर असल्याचाही आरोप केला जात होता. त्यामुळे सरकारचं नेमकं काय होणार हे आता 01 नोव्हेंबरला याबाबत स्पष्टता होण्याची शक्यता आहे.
राज्यामध्ये शिवसेनेचा शिंदे गट म्हणजेच बाळसाहेबांची शिवसेना आणि भाजप यांची सत्ता आहे, याच सत्तेचे भविष्य काय ? याची स्पष्टता सुप्रीम कोर्टात 01 नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आणि ठाकरे गटाचे सुभाष देसाई यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
उद्धव ठाकरे गटाने 16 आमदारांचे निलंबन, विधानसभा अध्यक्ष पदावरून घेतलेले निर्णय याच्या विरोधात धाव घेण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविरोधात याचिका दाखल करत ठाकरेंना आव्हान देत आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावा केला आहे.
त्यामुळे सरकार कायदेशीर की बेकायदेशीर याचा पेच सुप्रीम कोर्टात सुटणार आहे. याशिवाय शिवसेना कुणाची याचा देखील फैसला सुप्रीम कोर्टातच होणार आहे.
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचुड, एम आर शाह, कृष्ण मुरारी, हिमा कोहली, पी नरसिंमा यांच्यासमोर ही सुनावणी होणार असुन या सुनावणीकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….