“.तर तुम्हाला आश्चर्य वाटेल,” शिंदे गट, भाजपातील पक्षप्रवेशावरून चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे विधान…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर राज्यातील राजकारण बदलून गेले आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून वेगवेगळ्या नेत्यांना त्यांच्या गटात सामील करून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, राज्यातील आगामी घडामोडींवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. आगामी काळात राज्यात आश्चर्यकार घटना घडणार आहेत. भाजपा आणि शिंदे गटात अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे, असे बावनकुळे म्हणाले आहेत. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
आगामी काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षांचं त्यांचे कार्यकर्ते ऐकतील का? उद्धव टाकरे यांच्या कार्यकर्त्यांचं तर तुम्ही पाहातच आहेत. उद्धव ठाकरे गाटातील नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत आहात. त्यामुळे आगामी काळात दाणादाण उडणार आहे. २०२४ पर्यंत पक्षप्रवेशाचे बॉम्बस्फोट होणार आहेत. तुम्हाला आश्चर्य होईल, अशा व्यक्ती आमच्याकडे येणार आहेत. या तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड नाराजी आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
दरम्यान, एकनाथ शिंदे गटाला रोखण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून राजकीय डावपेच आखले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटात यवतमाळमधील दिग्गज नेते संजय देशमुख यांनी प्रवेश केला. शिंदे गटातील नेते तथा मंत्री संजय राठोड यांना रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून संजय देशमुख यांना बळ दिले जाणार आहे. अशाच पद्धीतीचे राजकीय डावपेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आखले जात आहेत. ठाकरे गटातील नेत्या दीपाली सय्यद या शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे राज्यभर दौरे करून स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानाला आता महत्त्व आले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….