“जयंत पाटलांच्या घरावर भाजपाचा झेंडा लागणार”, गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीत खळबळ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली. एकनाथ शिंदेंनी-भाजपाबरोबर जात सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेनेत फूट पाडण्यास भाजपाच कारणीभूत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येतो.
त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गोपीचंद पडळकर एका कार्यक्रमात बोलत होते. तेव्हा त्यांनी म्हटलं की, “भाजपाचा झेंडा आज राष्ट्रवादीच्या कार्यालयावर लागला आहे. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, हाच भाजपाचा झेंडा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावर दिसेल. त्यानंतर मुंबईच्या राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात नेमका झेंडा कोणाचा लागणार, यामुळे त्यांच्यात वाद होईल. त्यात बहुमताने कार्यकर्ते म्हणतील आता भाजपात प्रवेश करूया,” असेही गोपीचंद पडळकर म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर भाजपाचं पुढील लक्ष राष्ट्रवादी असल्याचं सांगितलं होतं. “शिवसेना एक मोठा पक्ष होता. त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणून, राजकारण करून तो पक्ष फोडण्यात आला. पण, दुसरं लक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असू शकतो हे मी बोललो होतो. कारण, शिवसेनेनंतर दुसरा मोठा पक्ष राष्ट्रवादी आहे,” असा दावा रोहित पवारांनी केला होता.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….