MPSC साठी लागा तयारीला…! ‘इतक्या’ पदांसाठी जाहिरात झाली प्रसिद्ध….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवेच्या विविध 5 संवर्गाच्या पदभरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MPSC च्या अधिकृत ट्विटर हँडलवरू ट्विट करत याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान अर्ज करण्याची पद्धत, प्रवर्गनिहाय तपशील, आवश्यक अर्हता, वयोमर्यादा, आरक्षण, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, इत्यादीबाबतच्या सविस्तर तपशीलासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in तसेच https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीचे तसेच सविस्तर जाहिरात वाचावी असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
अर्ज कधीपर्यंत करता येतील?
उमेदवारांना ऑनलाईन अर्ज https://mpsconline.gov.in या संकेतस्थळाद्वारे दिनांक २५ ऑक्टोबर, २०२२ ते दिनांक १४ नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील.
आयोगाच्या https://mpsc.gov.in तसेच https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली माहिती व जाहिरात अधिकृत समजण्यात येईल असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत खालील संवर्गातील पद भरतीसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत:
वरिष्ठ भूवैज्ञानिक, गट-अ, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, नागपूर -०७ पदे
कार्यकारी अभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट-अ – ०३ पदे
अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्य सेवा, गट-ब [ प्रशासन शाखा ] – ६५ पदे
औषधी निर्माता महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब आयुष संचालनालय, मुंबई- ०१ पद
सहायक (विधि), गट-ब (अराजपत्रित) -१२ पदे

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….