एसटी प्रवासात आजपासून 5 ते 75 रुपयांची हंगामी भाडेवाढ लागू, प्रवाशांना आर्थिक झळ…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- दरवर्षी दिवाळीच्या काळात एसटी प्रवास भाड्यात होणारी वाढ आजपासून लागू झाली आहे.
आजपासून एसटी प्रवासामध्ये 5 रुपये तर 75 रुपयांची वाढ झाली असून ही भाडेवाढ 31 ऑक्टोबर पर्यंत लागू असणार आहे. एसटी महामंडळाकडून दिवाळीच्या काळात महसूल वाढीसाठी दरवर्षी अशी वाढ लागू करण्यात येते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एस.टी. महामंडळाने केलेली हंगामी भाडेवाढ मध्यरात्रीपासून लागू झालेली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.
ही दरवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) आणि एसी बसेसला लागू राहील. शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही.
भाडेवाढ रद्द करण्याची प्रवाशांकडून मागणी
एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांना बोनस देऊन त्यांची दिवाळी गोड करण्यात आली असली तरी दुसरीकडे मात्र प्रवाशांना ऐन दिवाळीत आर्थिक झळ सोसून प्रवास करावा लागणार आहे महाराष्ट्राचे परिवहन महामंडळाने केलेली हंगामी भाडेवाढ ही प्रवाशांना परवडणारी नसून हे भाडेवाडी कमी करण्याची मागणी सर्व सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे
आरक्षण केलेल्या प्रवाशांना फरक द्यावा लागेल
ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे त्या प्रवाशांकडून आरक्षण तिकीट दर आणि नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल. ही भाडेवाढ एसटीच्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक, त्रैमासिक आणि विद्यार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. 1 नोव्हेबरपासून भाडेवाढ संपुष्टात येईल आणि नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारले जातील असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या गाड्यांचा प्रवास महागला
दादर ते स्वारगेट – साधी – सध्या 235 प्रस्तावित – 260
दादर ते स्वारगेट – शिवशाही सध्या 350 प्रस्तावित- 385
मुंबई ते कोल्हापूर – साधी गाडी सध्या – 565, प्रस्तावित – 625 , शिवशाही- सध्या 840, प्रस्तावित – 925
मुंबई ते नाशिक- साधी गाडी सध्या 400, प्रस्तावित 445, शिवशाही- 595, प्रस्तावित 655
मुंबई ते औरंगाबाद- साधी गाडी सध्या- 860 प्रस्तावित – 950, शिवशाही – सध्या 1280 प्रस्तावित – 1410
ही नवीन भाडेवाढ नाही
एसटी महामंडळाने केलेली ही दरवाढ नवीन नाही. दरवर्षी दिवाळीत होणारी ही भाडेवाढ आहे. दिवाकर रावते ज्यावेळी परिवहन मंत्री होते त्यावेळी ही भाडेवाढ सुरु करण्यात आली होती.
धुळे जिल्ह्यातील एसटी प्रवास भाड्यात अशी वाढ झाली आहे,
धुळे-मुंबई 560 रुपयेधुळे-पुणे 560 रुपयेधुळे-औरंगाबाद 250 रुपयेधुळे-नाशिक 260 रुपयेधुळे-नाशिक शिवशाही बस 395 रुपयेधुळे-जळगाव 155 रुपयेधुळे-दोंडाईचा 95 रुपयेधुळे-शिंदखेडा 80 रुपये

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….