मराठवाडा विदर्भात पावसाचा धुमाकूळ ; शेतकऱ्यांना फटका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने राज्यात थैमान घातलंय. राज्यातील अनेक भागांत गेल्या चार दिवसांत मुसळधार पाऊस बरसला असून काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय.
तर काल रात्री मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्याला पावसाचा फटका बसला असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय.
दरम्यान, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातूर, परभणी आणि विदर्भातील हिंगोली, वाशिम, अकोल्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या वाया गेलेल्या पिकाला आणखी फटका बसला आहे. तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करून तात्काळ मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
आज पावसाचा अंदाज
आज कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यासहित विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा – विरोधीपक्षनेते अजित पवार
राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मुख्यत्वे करून सोयाबीन आणि कापसाचे नुकसान झाले असून परतीच्या पावसाने सुद्धा शेतकऱ्यांचा अंत पाहिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधीपक्षनेते अजित पवारांनी केली आहे. तर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नाही असं मत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे आता सत्तारांवर टीकेची झोड उठू लागलीये.
दिवाळीत पावसाचे सावट दूर
हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या शनिवारपर्यंत (ता. २२) शहर व परिसरात सायंकाळनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मात्र पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता असून, सोमवारपासून (ता. २४) आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनादिवशी पावसाची शक्यता नसेल.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….