ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने, नवी मुंबईत शाखा ताब्यात घेण्यावरून वाद…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी मुंबई :- मागच्या तीन महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी केली. यानंतर भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली.
या दरम्यान शिंदे गटाकडून शिवसेनेच्या चिन्हावर दावा करण्यात आला. या सगळ्या प्रक्रियेत शिवसेनेचे चिन्ह गोठवण्यात आलं. मागच्या तीन महिन्यांपासून शिंदे गट आणि ठाकरे गटातील कार्यकर्ते कोणत्या ना कोणत्या कारणावरून आमनेसामने येत आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी ठाण्यात शाखा ताब्यात घेण्यावरून वाद झाला होता. ही घटना ताजी असतानाच नवी मुंबईतही असाच प्रकार घडला आहे. यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आले यावरून काही काळ वातावरण तणावाचे बनले होते.
नवी मुंबईत शिवसेना कार्यालय आहे. या कार्यालयावर शिंदे गटाकडून ताबा घेण्याचे काम काल (दि.19) करण्यात आले. यावरून ठाकरे गटातील काही कार्यकर्ते एकत्र येत शिंदे गटाचे आव्हान परतवून लावले. दरम्यान यावरून काही काळ वातावरण तणावाचे बनले होते. ठाण्यानंतर नवी मुंबईतही शाखा ताब्यात घेण्यावरून वाद झाल्याने ठाकरे गट आणि शिंदे गटातील कार्यकर्ते आमनेसामने आले.
शिंदे गटाकडून तुर्भे विभागातील 3 शाखांवर ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शिंदे गटाचे आव्हान परतवून लावले.
शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी कार्यकर्त्यांसह येत हातोडी आणि कटरने शाखेचा लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. यावर ठाकरे गटाकडून तीव्र विरोध केल्यानंतर तीनही शाखांवर आता दोन्ही गटाचे 2 टाळे लागले आहेत. दरम्यान दोन्हीही शाखा कार्यालये बंद स्थितीत आहेत. उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, उपशहर प्रमुख महेश कोटीवाले यांनी शाखा ताब्यात घेण्यासाठी आलेल्या शिंदे गटाला परतवून लावत थेट आव्हान दिले. दरम्यान यावरून काही काळ वातावरण तंग बनले होते.
भास्कर जाधव यांच्या विरोधात भाजप आक्रमक
संजय राऊत यांच्यानंतर ठाकरे गटाकडून आक्रमक बोलणारे नेते म्हणून भास्कर जाधव यांचे नाव घेतले जाते. भास्कर जाधव ज्या सभेला जातील त्या सभेत जोरदार टीका करताना पहायला मिळतात. यावरून शिंदे गट आणि भाजपचे नेतेही त्यांना प्रत्त्युत्तर देत असतात. दरम्यान भास्कर जाधव यांच्याविरोधात मुंबईत भाजपकडून बॅनरबाजी करत जोरदार टीका केली आहे. भाजपकडून माहीममध्ये आपण यांना पाहिलत का? अशा आशयाचे बॅनर लावले आहेत.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….