अखेर सरकारला आली जाग; एसटी कर्मचाऱ्यांचा बोनस केला डबल….!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला दिवाळीची भेट दिली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सरसकट ५ हजार रुपये इतकी रक्कम दिवाळीची भेट म्हणून देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
यासाठी राज्य सरकारने ४५ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.
या निर्णयाचा फायदा सुमारे ८७ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी वर्गाला होणार आहे. यापूर्वी म्हणजे काल जेव्हा बोनसची घोषणा झाली, तेव्हा कर्मचाऱ्यांना २,५०० रुपये तर अधिकाऱ्यांना ५ हजार रुपये बोनस घोषित कऱण्यात आला होता. मात्र त्यावरुन सरकारवर जोरदार टीका होत होती. अडीच हजार रुपये पुरेसे नाहीत, अशी टीका होत असतानाच सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करत नव्याने बोनस जाहीर केला आहे.
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक स्वरूपात दिवाळीची भेट दिली जाते. गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे प्रवासी संख्या घटल्याने एसटीला आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीतही महामंडळाकडून यंदा सरसकट अधिकारी व कर्मचारी वर्गाला ५ हजार रुपये दिवाळी भेट देण्यात येणार आहे. ही रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असेही चन्ने यांनी सांगितले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….