मोठी बातमी! राज्यात ‘या’ 19 खतांच्या विक्रीवर बंदी ; शेतकऱ्यांना न वापरण्याचे कृषी विभागाचे आवाहन…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शेतकरी आपल्या शेतीतून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी नवनवीन खतांचा वापर करतात. पण मात्र प्रमाणित खतांचा वापर करणे देखील तितकेच महत्वाचे आहे.
आता काही खते हे शेतकऱ्यांनी वापरू नयेत, असे आवाहन कृषी विभागाने (Department of Agriculture) दिले आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. खरीप आणि रब्बी हंगामासाठी तुम्ही खते ( Firtilizer ) खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आता कृषी सहसंचालकांनी तब्बल 19 कंपन्यांच्या खतांचे नमुने अप्रमाणित आढळल्याने त्याच्यावर बंदी घातली आह.
ही खते शेतकऱ्यांनी खरेदी करू नये, असे आवाहन देखील आवाहन कृषी विभागाकडून (Agriculture Department) करण्यात आले आहे. खरीप आणि रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार विविध प्रकारच्या खतांचे तब्बल 92 नमुने तपासणी घेण्यात आले होते. यातून 19 खतांचे नमुने अप्रमाणित आढळल्याने ही खत (Fertilizer) विक्री करण्यावर संपूर्ण राज्यात बंदी घालण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ही खते खरेदी करू नये, असे आवाहन देखील आता कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
ही खते खरेदी करू नये
शेतकऱ्यांनी जिंकेटेड एस एस पी, रामा फॉस्फेट उदयपूर, कृषक भारती को-ऑपरेटिव्ह चिलेटेड फेरस, सायन्स केमिकल्स नाशिक (Science Chemicals Nashik), एस एस पी के पी आर, ऍग्रो केम (Agro Chem), यासह विविध 19 खतांचे नमुने अप्रमणित आढळून आल्याने ही बंदी घालण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
का वापरू नये ही खते
खतांमधील इनग्रेड (Ingred) कमी झाल्याने ते अप्रमाणिक करण्याचे आदेश कृषी सहसंचालकांनी दिले आहेत. यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी या रासायनिक खतांची खरेदी करू नये, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. दरम्यान, या खतांवर संपूर्ण राज्यात बंदी घालण्यात आल्याने शेतकऱ्यांनी देखील आता सतर्क होणे गरजेचे आहे. अप्रमणित झालेल्या खतांचा काळाबाजार रोखण्याचे देखील आव्हान आता कृषी विभागासमोर निर्माण झाले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….