काँग्रेस अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून ५६१ प्रतिनिधी करणार मतदान…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता.१७ ऑक्टोबर) मतदान होणार आहे. महाराष्ट्रातून (Maharashtra) तब्बल ५६१ जण या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यातून मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) जादा मते घेतात की त्यांचे निवडणुकीतील प्रतिस्पर्धी शशी थरूर (Shashi Tharoor) हे आघाडी घेतात, याकडे राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष असणार आहे. (561 representatives from Maharashtra will vote in election for Congress president)
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक उद्या होणार आहे. त्या निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुंबईतील मुख्यालय टिळक भवन येथे सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत मतदान करता येणार आहे. देशभरातील सर्व राज्यांमध्ये हे मतदान होणार आहे. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे मतदानाचे केंद्र असून तीन बूथवर सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत राज्यातील ५६१ प्रदेश प्रतिनिधी आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात.
या निवडणुकीसाठीचे प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश कुमार, नरेंद्र रावत, आमदार कृष्णा पुनिया हे मतपेट्या घेऊन मुंबईत आले आहेत. त्यांनी रविवारी (ता. १६ ऑक्टोबर) टिळक भवन येथील मतदान केंद्रांची पाहणी केली. जे प्रदेश प्रदेश प्रतिनिधी मतदार आहेत, त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने बारकोड असलेले ओळखपत्र दिलेले आहे. ते ओळखपत्र आणि दुसरे कुठलाही फोटो पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे. त्यात ओळखपत्र म्हणून मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुक यापैकी एक अशी दोन्ही ओळखपत्रे दाखवल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर असे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रदेश प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांनी केले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….