शिंदे यांची घरवापसी होणार….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एक्शन मोडमध्ये आहे. यवतमाळमध्ये मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी माजी मंत्री संजय देशमुख आज शिवबंधन बांधत असताना दुसरीकडे बुलढाणा विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि आता शिंदे गटात सामील झालेले संजय गायकवाड यांना शह देण्यासाठी उद्धव गटाने हालचाली सुरू केल्या आहेत.
माजी आमदार विजयराज शिंदे हे पुन्हा शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिंदे हे शिवसेनेचे 3 वेळेस आमदार राहिले आहेत. शिंदे हे सध्या भाजपात आहेत. त्यामुळे बुलढाण्याचे शिंदे गटाचे विद्यमान आ.संजय गायकवाड यांना विजयराज शिंदे यांच्याकडून आव्हान देण्याची रणनिती उद्धव गटाकडून आखल्या जात असल्याची चर्चा सध्या जिल्हाभरात होत आहे.
शिवबंधन कधी बांधणार, असा प्रश्न शिंदे यांना विचारण्यात आला. यावर “ही लोकशाही आहे. आणि मी 15 वर्षात शिवसेनेचा आमदार म्हणून केलेल्या कामाची कुणी दखल घेत असेल तर वावगं काय? मात्र उद्धव गटाच्या कुठल्याच मोठ्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क केलेला नाही”, अशी प्रतिक्रिया विजयराज शिंदे यांनी दिली. दरम्यान बुलढाण्यात आता बंडखोर आ.संजय गायकवाड यांना शह देण्यासाठी हालचालींना वेग आल्याच चित्र राजकीय वर्तुळात आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….