उद्धव ठाकरे भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गट भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्याविरोधात आक्षेप घेण्याच्या तयारीत आहे. मुरजी पटेल यांच्यावर असलेल्या गुन्ह्यामुळे हा आक्षेप घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक संदीप नाईक यांच्याकडून मुरजी पटेल यांच्यावर आक्षेप घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संदीप नाईक हे आज दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेऊन मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर घेतलेल्या चार ते पाच विषयांवरील आक्षेपासंदर्भात माहिती देणार असल्याचं समजतंय.
अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेल्या मुरजी पटेल हे २०१७ मध्ये अंधेरी महापालिकेत निवडून आले होते. त्यावेळी सुद्धा संदीप नाईक यांनी मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नी केशरबेन पटेल यांच्याविरोधात जात प्रमाणपत्रावरून आक्षेप घेतला होता.
या आक्षेपानंतर पाटीदार समाजातील पटेल यांनी ओबीसी म्हणून सादर केलेले जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविले होते. याविरोधात पटेल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती.
त्यामुळे एप्रिल २०१९ मध्ये मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नीचं नगरसेवकपद गेले होते दरम्यान, आता दुपारी २ वाजेच्या पत्रकारपरिषदेत संदीप नाईक हे मुरजी पटेल यांच्याविरोधात काय गौप्यस्फोट करतात हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….