ठाकरेंकडं आता फक्त…; नारायण राणेंनी पुन्हा डिवचलं….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमुळे भाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा आमने-सामने आले आहे. त्यामुळे आता आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्याविरोधात नारायण राणे मैदानात उतरले असून राणे सातत्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत आहे.
सर्व पक्ष एकत्र आले म्हणजे शक्ती तयार होत नाही. त्यांच्यात एकमत कुठय, असा सवाल राणे यांनी केला. भाजपची देशात, महाराष्ट्रात आणि सर्वाधिक राज्यात सत्ता आहे, असं म्हणत राणे यांनी उद्धव ठाकरेंना भाषा सुधारण्याचा सल्ला दिला. ते म्हणायचे सरकार पाडून दाखवा. आम्ही सरकार पाडून दाखवलं. आता आम्ही मैदानात आहोत. त्यामुळे आतातरी उद्धव ठाकरे यांनी मातोश्री सोडा, अस आव्हानही राणे यांनी दिलं.
यावेळी राणे यांना आदित्य ठाकरे यांचा प्रश्न विचारला. त्यावर राणे संतापलेले पाहायला मिळाले. आदित्यविषयी मला प्रश्न विचारू नका, अन्यथा मी निघतो, असंही राणे म्हणाले. ठाकरेंकडे काहीही राहिलं नाही. राज्य गेलं, मुंबई गेली, आता वरळी आली का? नंतर मातोश्री वाचविण्याची वेळ येईल, असा टोलाही राणेंनी लगावला. तसेच रमेश लटके हयात असते तर ते शिंदे गटात आले असते, असा दावाही त्यांनी केला.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….