मुंबई विमानतळावर सापडलं सोन्याचं घबाड, अधिकारीही झाले अवाक्….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबई ATS कडून काल एका दहशतवाद्याला पकडण्यात आल्याने मुंबई पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभुमीवर मुंबई कस्टम विभागाकडून मुंबई विमानतळावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई कस्टम विभागाकडून तब्बल 22 लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. तर एका खास बेल्टमधून 5 कोटी 20 लाखांचे सोने लपवून नेत असताना कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम आणि सोने दुबईहून मुंबईत येत असल्याची माहिती मुंबई कस्टम विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.
मुंबई विमानतळावर कस्टमने विदेशी नागरिकाकडून 22 लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त केले. 95 हजार दुबईचे चलन घेऊन परदेशी नागरिक मुंबईहून दुबईला जात होते. कस्टमच्या दुसऱ्या एका कारवाईत सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली दोन परदेशी नागरिकांना पकडण्यात आले. ते एका खास पट्ट्यात लपवून 5 कोटींचे सोने तस्करी करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दुबईतून सोन्याची तस्करी होणार असल्याची मुंबई कस्टम विभागाला कुणकुण लागली होती. काल (दि.13) संध्याकाळी आलेल्या एका भारतीय प्रवाशाने आणलेले तब्बल 9 किलो 89 ग्रॅम सोने कस्टम विभागाने पकडले असून याची किंमत 5 कोटी 20 लाख रुपये इतकी आहे. या प्रवाशाने शर्टाच्या आतील बाजूला एक कापडाचा पट्टा करून त्यामध्ये हे सोने लपविले होते.
कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीमध्ये त्यांना या व्यक्तीकडे 15 सोन्याची बिस्कीटे सापडली. दोन सुदानी नागरिकांनी आपल्याकडे हे सोने दिले असल्याची माहिती या भारतीय व्यक्तीने कस्टम अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर, त्याच विमानातून आलेल्या या दोन्ही सुदानी नागरिकांना देखील अटक करण्यात आली. या तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
तर दुसऱ्या घटनेमध्ये, शारजातून चेन्नईमार्गे मुंबई गाठलेल्या एका व्यक्तीकडून 1 किलो 80 ग्रॅम सोने कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. याची किंमत ९९ लाख रुपये इतकी आहे. हे सोने त्याने त्याच्या अंर्तवस्त्रामध्ये लपविले होते. तिसऱ्या जेहाद येथून आलेल्या दोन भारतीयांकडून अनुक्रमे 1068 ग्रॅम आणि 1186 ग्रॅम सोने पकडण्यात कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले. या सोन्याची अनुक्रमे किंमत 56 लाख आणि 58 लाख रुपये इतकी आहे.
कस्टम विभागाच्या पथकाने 11 आणि 12 ऑक्टोंबरला मुंबई विमानतळावर विशेष शोध मोहीम राबवली आहे. यावेळी पथकाने एकूण 15 किलो सोने जप्त केले. त्याचे बाजारमूल्य अंदाजे 8 कोटी रुपये आहे. ही जप्ती चार वेगवेगळ्या प्रकरणात घडली आहे. याशिवाय अन्य दोन प्रकरणांत 22 लाख रुपयांचे विदेशी चलनही जप्त करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकरणात 7 जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….